Anil Parab यांच्याकडून BKC मधील सभेच्या पूर्वतयारीची पाहणी
आम्हाला बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे. याचा पोटशूळ त्यांना आहेच. त्यांना ही सभा अभूतपुर्व होणार आहे हे माहित आहे. त्यामुळे त्याला आडव कसं जायचं हे बघत आहेत. पण आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. आम्ही सभेकडे लक्ष देतो. तसेच निवडणुका कधीही होउदेत. शिवसेना ताकदीने लढणार आहे. उद्या त्याची प्रचिती दिसेल, असेही परब म्हणाले आहेत.
मुंबई : गेल्या तीन सभांमधून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) राज्यात जोरदार रान पेटवलं आहे. हिंदूत्व, हनुमान चालीसा, मशीदीवरील भोंगे (Loudspeakr Row) यावरून शिवसेनेवर टीकेची झोड उडवली आहे. त्यातच आगामी दिवसात महापालिकांच्या निवडणुकांचे बिगूल वाजतंय. त्यामुळे भाजपसहीत इतर राजकीय पक्ष हेही जोमाने तयारीला लागले आहेत. त्यामुळे आता शिवसेनाही मैदानात उतरत आहे. त्यासाठी शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. त्याची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या बीकेसीतील सभेने होणार आहे. त्या सभेवरून आता शिवसेना नेते अनिल परब यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला आहे. शिवसेनेचे नेते या सभेत मार्गदर्शन करतील. पक्षप्रमुख शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. अशी सभा दरवर्षी होते. यावेळी बीकेसीतलं सगळ्यात मोठं मैदान आहे. हे मैदान कमी पडेल, अशी प्रतिक्रिया यावेळी परबांनी दिली आहे.