BIG BREAKING | उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार?; म्हणाले, ‘मी तयार…’
VIDEO | महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार, नेमकं खासगीत काय केलं भाष्य?
मुंबई, ७ ऑगस्ट २०२३ | राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यास तयार असल्याचे खासगीत म्हटले आहे. ते म्हणाले, मी राज ठाकरे यांना फोन करण्यास तयार आहे आणि वेळ आल्यास राज ठाकरे यांच्यासह बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकांपर्यंत कोणती सूतं जुळताय का? हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसेतील काही मोठे नेते वारंवार हे भाष्य करताना दिसतात की, आता राजकीय उलथापालथ झाल्यानंतर तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवं…मात्र आता पुढे नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.