मला हलता येत नव्हतं,पण यांच्या रात्रीच्या हालचाली सुरू होत्या, उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यावर टीका

“मला हलता येत नव्हतं,पण यांच्या रात्रीच्या हालचाली सुरू होत्या”, उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यावर टीका

| Updated on: Jul 10, 2023 | 2:15 PM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली होती. "माझ्यामुळे अनेकजणांच्या कंबरेचे आणि गळ्याचे पट्टे निघाले. सर्वजण फिरायला लागले. घराबाहेर पडले. नाही तर घरातच बसून होते," असं ते म्हणाले. याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमरावती : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली होती. “माझ्यामुळे अनेकजणांच्या कंबरेचे आणि गळ्याचे पट्टे निघाले. सर्वजण फिरायला लागले. घराबाहेर पडले. नाही तर घरातच बसून होते,” असं ते म्हणाले. याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी रुग्णालयात असताना मला हलता येत नव्हतं. पण यांच्या रात्रीच्या हालचाली सुरू होत्या. हुडी घालून कोण फिरत होतं? त्याचं उत्तर आधी द्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.”

Published on: Jul 10, 2023 02:15 PM