“मी अर्धवटराव तर फडणवीस आवडाबाई का?”, उद्धव ठाकरे यांचा पलटवार
कोविडची लस मोदींनी तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का?, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगलावला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं.
मुंबई : कोविडची लस मोदींनी तयार केली, मग बाकीचे काय गवत उपटत होते का?, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगलावला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं की, “अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो, ते पूर्ण ऐकलेच नाही… असो, आता ऐका… याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला … म्हणून म्हणतो स्क्रिप्ट रायटर बदला!” या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.”मला अर्धवटराव म्हणत असतील तर देवेंद्र फडणवीस काय आवडाबाई आहेत का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. पण सध्या देवेंद्र फडणवीस हे ना-आवडाबाई झाले आहेत,” असं ठाकरेंनी म्हटलं आहे.
Published on: Jun 20, 2023 03:58 PM
Latest Videos