“घरगड्याला कोणी नगरविकास मंत्री करतं का?”, एकनाथ शिंदे यांच्या ‘त्या’ विधानावर उद्धव ठाकरे यांचा पलटवार
शिवसेनेच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांना संवगडी, सहकारी समजायचे. हे शिवसैनिकांना घरगडी समजायचे. बाळासाहेब आणि तुमच्यामध्ये हाच फरक होता." यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या बैठकीत भूमिका मांडली.
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांना संवगडी, सहकारी समजायचे. हे शिवसैनिकांना घरगडी समजायचे. बाळासाहेब आणि तुमच्यामध्ये हाच फरक होता.” यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या बैठकीत भूमिका मांडली. “घरगड्याला कुणी नगरविकास मंत्री करतं का?” असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी बैठकीत उपस्थित केला. “तसेच कुठल्याही आमिषाला बळी पडू नका,” अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी आपल्या माजी नगरसेवकांना केली. “एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने शेतात जातात याचा आनंद आहेत, पण हेलिकॉप्टर उतरण्याऐवढी शिंदेंची शेती आहे का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच सर्व निधी एकनाथ शिंदेंचे समर्थक असलेल्या नगरसेवकांनाच दिल्याची तक्रार नगरसेवकांनी बैठकीत केली. पहिल्यांदा निवडून आलात तेव्हा तुमच्याकडे कुठे फंड होता?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.