काँग्रेससोबत का जावं लागलं? उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “भाजपने मला…”
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी यवतमाळमध्ये पोहरादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर संजय राठोड यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेतला. यावेळी त्यांनी आपण काँग्रेससोबत का गेलो यांचं कारण दिलं आहे.
यवतमाळ: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी यवतमाळमध्ये पोहरादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर संजय राठोड यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेतला. यावेळी त्यांनी आपण काँग्रेससोबत का गेलो यांचं कारण दिलं आहे. “ज्या ज्या शिवसैनिकांच्या मागे ईडी लावली त्यांना सांगणार आहे त्या दलालाच्या घरी जा आणि त्यांना विचारा काय पुरावे आहेत. आज हीच लोक भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. हे हिंदुत्व भाजपला मान्य आहे का? तुम्ही मला ढकलले म्हणून मी काँग्रेससोबत गेलो. असं मी काय केले होते, तुम्ही मला सोडून दिले. मेहबुबा मुफ्तीसोबत गेले, मग मी काँग्रेसमध्ये गेलो तर काय झाले? भाजपचं हिंदुत्व, प्रेम बेगडी आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Published on: Jul 10, 2023 09:27 AM
Latest Videos