Uddhav Thackeray Uncut | कोरोना अंगावर काढू नका, वेळेवर उपचार घ्या, मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन
Uddhav Thackeray Uncut | कोरोना अंगावर काढू नका, वेळेवर उपचार घ्या, मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन
मुंबई : राज्य सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून जात आहे. सध्या रुग्ण कमी झाले असले तरी अजूनही संकट टळलेलं नाही. याच कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला तसेच डॉक्टरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी कोरोनाला अंगावर काढू नका, वेळेवर उपचार घ्या असे सांगितलेय. तसेच पावसाळ्यात काही रोग व साथी उद्भवतात, त्यांची काही लक्षणे आणि कोविडची लक्षणे (Corona) एकसारखी असतात त्यामुळे डॉक्टर्सनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमधील कोविडची लक्षणे वेळीच ओळखावीत. तसेच गृह विलगीकरणातील रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत आहेत किंवा नाही ते बारकाईने पाहावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केल्या. ते आज महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने आयोजित केलेल्या कोरोना संदर्भातील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना बोलत होते.