40 दिवस तुरुंगात राहिलेल्या शिंदेंना तुरुंगाची भीती कशी वाटेल? आदित्य ठाकरेंना कोणाचा खोचक सवाल
जेव्हा ही सगळी मंडळी आपल्याला सोडून गेली, तुम्हाला लाथाडून गेली, सगळे आमदार गुवाहाटीत असताना आपण रडत होतात. उद्धव ठाकरे वारंवार एक गोष्ट सांगत होते, या माझ्याशी बोला, आम्ही तुमच्याशी बोलायला तयार आहे. तुमची नाराजी असेल तर मला सांगा, हे तुमचं रडणं चालू होतं. या व्यक्तीचं नव्हतं
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटावर शिंदे गटाकडून खसपूर समाचार घेतला जात आहे. आताही शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बेळगाव प्रश्नावर 40 दिवस तुरूंगवास भोगला त्याला तुरुंगाची भीती वाटते असे बोलता. ते रडत नव्हते तुम्ही रडत होता. ते रडायचे असते तर त्यांच्यावर एवढ्या केसेस झाल्या नसत्या. आपल्या वडीलांवर आणि तुमच्यावर एकही केस नाहीये आणि तुम्ही तुरुंगवासासाठी ते रडले म्हणून सांगताय. काय बोलताय याचा जरा विचार तरी करा. आजपर्यंत म्हणत होतो की तुमच्या प्रवक्त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय पण नाही. सत्ता, पद गेल्याने तुमच्या डोक्यावर पण या वयात परिणाम झालाय अशी खरमरीत टीका केली आहे.