Ambadas Danve | ‘आधी स्वता:च सांभाळा एवढच सांगेन’ दानवे यांच वक्तव्य-TV9
यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेताना, पैठणमध्ये कार्यक्रमाला 50 कार्यकर्तेही नव्हते त्यामुळे त्यांनी आधी स्वतःचा सांभाळावं त्यानंतर दुसऱ्यांना बोलावं असं म्हटलं आहे.
राज्याच्या शिवसेनेच सध्या दोन गट तयार झाले असून एक उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि दुसरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असणारा शिंदे गट. आता या दोघांच्या मध्ये खरी शिवसेना कोणाची यावरून चांगलीच जुंपलेली आहे. दरम्यान दसरा मेळाव्यावरून देखिल आता शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान दसरा मेळाव्यासंदर्भात सर्व त्या प्रक्रिया पुर्ण केल्या असून अर्ज देखिल महापालिकेला केला आहे. आणि जर परवानगी नाही मिळाली तर आम्ही योग्य ती पावले उचलू असे शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेताना, पैठणमध्ये कार्यक्रमाला 50 कार्यकर्तेही नव्हते त्यामुळे त्यांनी आधी स्वतःचा सांभाळावं त्यानंतर दुसऱ्यांना बोलावं असं म्हटलं आहे. दोन दिवसांपुर्वी भुमरे यांनी आमच्या संपर्कात शिवसेनेचे दोन आमदार असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर दानवे यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.