Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या ट्रॅम्पमध्ये अडकू नये, चंद्रशेखर बावनकुळे यांची सडकून टीका

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या ट्रॅम्पमध्ये अडकू नये, चंद्रशेखर बावनकुळे यांची सडकून टीका

| Updated on: Jul 26, 2022 | 3:50 PM

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या ट्रॅम्पमध्ये न अडकण्याचा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला 

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरे (Udhav Thakeray) यांची संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेली मुलाखत सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच गाजत आहे. या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (BJP Chandrashekhar Bawankule ) यांनी ही मुलाखत नियोजीत असल्याचे वक्तव्य केले. राऊतचं प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तर ही त्यांनीच लिहून दिलेले असते, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या ट्रॅपमध्ये न अडकण्याचा सल्ला ही त्यांनी दिला. तसेच आपल्याच आमदारांवरती उद्धव ठाकरे यांनी जे आरोप (Allegation)लावले आहेत, ते निंदाजनक आहे. 40 आमदारांनी एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी लावला आहे. भाजपवर आरोप केले आहेत. हे आता उद्धव ठाकरे यांनी थांबवायला हवं. नाहीतर त्यांच्यासोबत आता जे आमदार आहेत, ते ही त्यांच्यासोबत राहणार नाहीत, असा टोला ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रसमोर आपलं अपयश अशा मुलाखतीतून न दाखवता आता जो उरलासुरला पक्षा आहे तो सांभाळावा असा टोला ही त्यांनी लगावला.