नराधमांना पाठीशी घालणारे याचिकाकर्ते विकृत, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

नराधमांना पाठीशी घालणारे याचिकाकर्ते विकृत, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

| Updated on: Aug 24, 2024 | 4:37 PM

भारत बंदच्या वेळी हे याचिकाकर्ते कुठे गेले होते. त्यावेळी त्यांना याचिका दाखल करण्याचे सुचले नाही. त्यामुळे या सर्व नराधमांना पाठीशी घालणारे याचिकाकर्ते विकृत आहेत अशा शब्दात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागोजागी आज निषेध आंदोलन केले. शिवसेना भवनाजवळ शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी काळा मास्क लावून आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह निषेध आंदोलन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टिका केली. ते पुढे म्हणाले की भारत बंद वेळी देशभर रेल्वे बंद करण्यात आल्या. त्यावेळी महाराष्ट्रात काही झाले नाही. परंतू त्यावेळी हे याचिकाकर्ते झोपले होते. हे याचिकाकर्ते कोण आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे.यांना भारत बंद वेळी याचिका करण्याचे सुचले नव्हते. आता त्यांना नराधमांना पाठिशी घालायचे आहे म्हणून कोर्टात जाण्याची बुद्धी सुचली. नराधमांना पाठिशी घालणारे देखील विकृत असल्याची जोरदार टिका उद्धव ठाकरे यांनी भर पावसात झालेल्या या आंदोलनात केली. शिवसेना भवनजवळ झालेल्या या आंदोलनाला खासदार अरविंद सावंत, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, विशाखा राऊत आणि अन्य नेते उपस्थित होते.

Published on: Aug 24, 2024 01:08 PM