“मी कलंक म्हटलं, ते एवढं लागलं, मग तुम्ही…?”, उद्धव ठाकरे ‘कलंक’ शब्दावर ठाम?
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर होते. काल त्यांनी नागपूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेले कलंक आहेत, अशी टीका केली. यानंतर भाजपकडून ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला. परंतु उद्धव ठाकरे हे त्यांच्या केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर होते. काल त्यांनी नागपूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेले कलंक आहेत, अशी टीका केली. यानंतर भाजपकडून ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला. परंतु उद्धव ठाकरे हे त्यांच्या केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ते म्हणाले की, “मी कलंक म्हटलं, त्यात एवढं लागण्यासारख काय? तुम्ही एखाद्या माणसला भ्रष्ट म्हणता, त्यावेळी कलंक लावत नाही का? तुम्ही भ्ष्टाचाराचे आरोप करुन एखाद्याला कलंकित करता. नंतर त्याला मंत्रिमंडळात स्थान देता, मग त्याने समाजात वावरायच कसं? माझा कलंक शब्द इतका परिणामकारक ठरेल असं वाटलं नव्हतं. जनाचं नाही किमान मनाचं भान ठेवा आरोप करताना.मला हे काही बोलताना गंमत वाटत नाही.”
Published on: Jul 11, 2023 04:16 PM
Latest Videos