Uddhav Thackeray : लोकशाही मृतावस्थेत नेऊन अमृत महोत्सवी वर्ष साजरे होणार तरी कसे?
आज सत्ता आहे म्हणून त्याचा कसाही वापर सुरु आहे. देशात सध्या लोकशाही नाही तर त्यामुळे हे स्वातंत्र्य आणि त्याचा हा अमृतमहोत्सव होऊच शकत नाही असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे. अमृत महोत्सव अमृता सारखाच हवा. अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल तर अमृत महोत्सव कसला असे सवाल त्यांनी केंद्राला विचारला आहे.
मुंबई : सोशल मिडियाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. ही अभिमानाची बाब असली तरी देशात खरोखरच लोकशाही जीवंत राहिली का असा असा सवाल उपस्थित करीत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. प्रादेशिक पक्ष संपवायची भाषा बोलली जात आहे. देशात संघराज्य नको हे तुमचे मत असून याला ते जनतेवर का लादता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आज सत्ता आहे म्हणून त्याचा कसाही वापर सुरु आहे. देशात सध्या लोकशाही नाही तर त्यामुळे हे स्वातंत्र्य आणि त्याचा हा अमृतमहोत्सव होऊच शकत नाही असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे. अमृत महोत्सव अमृता सारखाच हवा. अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल तर अमृत महोत्सव कसला असे सवाल त्यांनी केंद्राला विचारला आहे.
Latest Videos