“एनडीएमध्ये ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष शिल्लक,” उद्धव ठाकरे यांचा टोला
विरोधी पक्षांचा एल्गार पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एनडीएची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला 36 पक्षांची उपस्थिती होती, असं म्हटलं आहे. एनडीएच्या या बैठकीवरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीतून टीका केली आहे.
मुंबई, 26 जुलै 2023 | विरोधी पक्षांचा एल्गार पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एनडीएची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला 36 पक्षांची उपस्थिती होती, असं म्हटलं आहे. एनडीएच्या या बैठकीवरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीतून टीका केली आहे. ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात बऱ्याच वर्षांनंतर या देशात ‘एनडीए’ नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे, हे कळलं. आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची इंडिया नावाची एक आघाडी झाली आहे, या आघाडीला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदम आपल्या आठवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या, ठेवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या आणि 36 पक्षांची जेवणावळ त्यांनी घातली. खरंतर 36 पक्षांची त्यांना गरज नाहीये. त्यांच्या एनडीएमध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत. बाकी पक्ष राहिलेत कुठे. एनडीएतल्या काही पक्षांचा तर एकही खासदार नाहीये. खरी शिवसेना तर ‘एनडीए’त नाहीच आहे. सगळे गद्दार तिकडे गेले आहेत. ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष आता एनडीएत आता शिल्लक राहिले आहेत.”