कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
उद्धव ठाकरे यांची नांदेड येथील लोहा-कंधार येथे प्रचारसभा झाली. यासभेत त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. राष्ट्रीय स्वयं संघाला 100 वर्षे झाली आहे.भाजपात पूर्वीची शिस्त राहीलेली नाही.याच साठी संघाने भाजपा तयार केला होता का ? असा सवाल ठाकरे यांनी या सभेत केला आहे.
उद्धव ठाकरे यांची नांदेड येथील लोहा-कंधार येथे प्रचारसभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.ठाकरे म्हणाले की पूर्वीचा भाजपा म्हणजे बंडखोरी करायचं धाडस कोणी करायचं नाही. आता यांनी केलेल्या भाजपाची वाताहत पाहा काय झाली आहे. एकनाथ पवार भाजपाला सोडून आमच्याकडे आले आम्ही विचारले की एवढा सत्ताधारी पक्ष सोडून तुम्ही आलात माझ्याकडे काय आहे. ? माझ्याकडे अंधार आहे. तर ते म्हणाले तुमच्याकडे मशाल आहे. तुमच्याकडे लख्खं प्रकाश पसरला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की यांना महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आठवण येत आहे. मी असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली होती आठवतंय नाही. यांनी सरकार पाडले नसते तर पुन्हा दुसऱ्यांदा कर्जमुक्ती दिली असती तेवढी धमक आपल्यात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. आता माता भगिनींना 1500 रुपये दिले जात आहे. माझे विचारणे आहे की माता – भगिनींना 1500 रुपयात भागतं का ? आपले सरकार आले तर 3000 रुपये माता- भगिनींना दिले जाईल असेही ठाकरे म्हणाले. सगळीकडे कंत्राटदाराचं भलं केलं जात आहे, आता म्हणे शक्तीपीठ महामार्ग बांधला जात आहे.कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं होत आहे अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे.