उद्धव ठाकरे यांनी उडवली फडणवीस यांची खिल्ली; ‘हास्यजत्रेचा प्रयोग! म्हणे मोदी यांनी लस…’
यावेळी फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करताना भलताच दावा केला होता. त्यावर सडकून टीका केली. फडणवीस यांनी, मोदींनी लस तयार केली म्हणून 100 देश वाचले असं म्हटलं होतं.
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात भाजपसह शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार वार प्रहार केले. यावेळी फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक करताना भलताच दावा केला होता. त्यावर सडकून टीका केली. फडणवीस यांनी, मोदींनी लस तयार केली म्हणून 100 देश वाचले असं म्हटलं होतं. त्यावरून मोदींनी लस तयार केली तर संशोधक काय गवत उपटत होते का? असा सवाल करत ठाकरे यांनी फडणवीस यांच्या खिल्ली उडवली आहे. फडणवीस यांनी भाजपच्या कल्याणमधील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली होती. त्यांनी ठाकरे यांचे भाषण म्हणजे ओकारी. मोदींवर टीका करणे म्हणेज सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याचे म्हणत ठाकरे यांच्यावर अत्यंत जहरी भाषेत निशाणा साधला होता. त्यावर ठाकरे यांनी भर सभेत हा व्हिडिओ लावत फडणवीस यांची खिल्ली उडवली. तसेच ठाकरे म्हणाले की, आज हस्यजत्रेचा प्रयोग झाला. मात्र काल फडणवीसांचा एक प्रयोग झाला. त्यात मोदीजींनी कोविडची लस तयार केल्यामुळे आपण सगळे येथे येऊ शकलो असं ते म्हणतायत. त्यांच्या डोक्यात कोणता व्हायरस घुसला काय कळत नाही. या अंधभक्तांनाच लस देण्याची गरज असून यांना समीर चौगुलेंच्या दवाखान्यात समुपदेशनासाठी पाठवले पाहिजे.