Special Report | राऊतांना ईडीकडून अटक,उद्धव ठाकरेंचा संताप

Special Report | राऊतांना ईडीकडून अटक,उद्धव ठाकरेंचा संताप

| Updated on: Aug 01, 2022 | 10:54 PM

उद्धव ठाकरेंनीही भाजपकडून घृणास्पद राजकारण सुरु असल्याचा घणाघात केला. भाजपसमोर शरण गेलेल्यांचा सत्तेचा उतरल्यावर पर्दाफाश होईल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. त्यांचा थेट निशाणा हा, ईडीच्या कारवाईनंतर एक तर भाजप किंवा शिंदे गटात गेलेल्या आमदार आणि नेत्यांवर आहे. याआधी सोमय्यांनी नारायण राणेंवर गैरव्यवहाराचे आरोप केले. नंतर राणे भाजपात गेले आणि मंत्री झाले सोमय्यांनी विजय कुमार गावितांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. नंतर गावित आणि त्यांची मुलगी सुद्धा भाजपत जावून लोकप्रतिनिधी बनले सोमय्यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते बबनराव पाचपुतेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले., सध्या बबनराव पाचपुते सुद्धा भाजपात आहे आणि आमदारही आहेत.

मुंबई : संजय राऊतांवरील(Sanjay Raut) या कारवाईनंतर उद्धव ठाकरे राऊतांच्या कुटुंबीयांसोबत भक्कम उभे आहेत. उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) भांडुपच्या राऊतांच्या घरी जाऊन, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी राऊतांच्या आईचीही विचारपूस केली आणि राऊत कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न करत, शिवसेना सोबत असल्याचंही सांगितलं. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. राऊत भाजपसमोर शरण गेले नाहीत, त्याचा अभिमान असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. राऊतांना ईडीनं अटक केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, भाजपवरच निशाणा साधलाय.

उद्धव ठाकरेंनीही भाजपकडून घृणास्पद राजकारण सुरु असल्याचा घणाघात केला. भाजपसमोर शरण गेलेल्यांचा सत्तेचा उतरल्यावर पर्दाफाश होईल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. त्यांचा थेट निशाणा हा, ईडीच्या कारवाईनंतर एक तर भाजप किंवा शिंदे गटात गेलेल्या आमदार आणि नेत्यांवर आहे. याआधी सोमय्यांनी नारायण राणेंवर गैरव्यवहाराचे आरोप केले. नंतर राणे भाजपात गेले आणि मंत्री झाले
सोमय्यांनी विजय कुमार गावितांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. नंतर गावित आणि त्यांची मुलगी सुद्धा भाजपत जावून लोकप्रतिनिधी बनले
सोमय्यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते बबनराव पाचपुतेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले., सध्या बबनराव पाचपुते सुद्धा भाजपात आहे आणि आमदारही आहेत.

सोमय्यांनी काँग्रेसमध्ये असणाऱ्या कृपाशंकर सिंहांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते कृपाशंकर सिंह सुद्धा सध्या भाजपत आहेत., आणि त्यांच्यावर भाजपनं मुंबई महापालिकेत उत्तर भारतीय मतदारांची जबाबदारी सुद्धा सोपवलीय. त्यानंतर आता सोमय्यांनी शिवसेनेत राहिलेल्या प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव कुटुंबियांवर आरोप केले. सध्या हे दोन्ही आमदार शिंदे-भाजप सरकारमध्ये आहेत. खासदार भावना गवळींवरही सोमय्या आरोप केले. त्याही आता शिंदे गटात आल्या. त्यांना लोकसभेत प्रतोद केलंय. भावना गवळीचा तर ईडीला शोध होता. मात्र आता आपल्याला कोर्टानंच क्लीन चिट दिल्याचा दावा त्या करतायत.