Special Report | उध्दव ठाकरेंचे अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार ?

Special Report | उध्दव ठाकरेंचे अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार ?

| Updated on: Jul 29, 2022 | 11:27 PM

अर्जुन खोतकरांना शिंदे गटात आणायचंच असा चंगच अब्दुल सत्तारांनी बांधलेला दिसतोय. खोतकरांसाठीच ते दिल्लीत आले होते. श्रीकांत शिंदेच्या घरी जी बैठक झाली, त्या बैठकीतही खोतकरांसोबत अब्दुल सत्तार उपस्थित होते.या बैठकीनंतर सत्तारांनी पुन्हा दावा केला की, खोतकर 31 तारखेला सिल्लोडच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेत प्रवेश करणार.

मुंबई : आता हे निश्चित झालंय की, उद्धव ठाकरेंचे(Uddhav Thackeray) अर्जुन खोतकर(Arjun Khotkar) शिंदे गटात जाणार आहेत. शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर जवळपास 5 दिवस दिल्लीत होते.आधी मुख्यमंत्री शिंदे-दानवेंच्या उपस्थितीतली बैठक आणि नंतर शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या दिल्लीतल्या घरी झालेल्या बैठकीनंतर, ते महाराष्ट्रात आलेत. आता मतदार संघात जाऊन निर्णय जाहीर करणार असं दिल्लीहून रवाना होण्याआधी खोतकरांनी सांगितलंय.अर्जुन खोतकरांना शिंदे गटात आणायचंच असा चंगच अब्दुल सत्तारांनी बांधलेला दिसतोय. खोतकरांसाठीच ते दिल्लीत आले होते. श्रीकांत शिंदेच्या घरी जी बैठक झाली, त्या बैठकीतही खोतकरांसोबत अब्दुल सत्तार उपस्थित होते.या बैठकीनंतर सत्तारांनी पुन्हा दावा केला की, खोतकर 31 तारखेला सिल्लोडच्या मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेत प्रवेश करणार. खोतकरांनाही शिंदेंसोबत जायचंच आहे, त्याआधी त्यांना उद्धव ठाकरेंशी बोलायचं आहे. ईडी मागे लागल्यानंच खोतकर शिंदे गटात जात असल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय. स्वत: खोतकरांनीही कुटुंबांच्या अडचणी समजून घ्याव्यात असा सूचक इशारा दिला होता. आमदार खासदारांनंतर आता नेतेही शिंदे गटात जाणं पसंत करतायत. पण अर्जुन खोतकरांसारखा मराठवाड्यातील कट्टर शिवसैनिकाचं शिंदे गटात जाणं हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणारं असेल

Published on: Jul 29, 2022 11:26 PM