Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या ऑफिसमधून उद्धव ठाकरेंचा फोटो गायब, औरंगाबादेत चर्चा

Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या ऑफिसमधून उद्धव ठाकरेंचा फोटो गायब, औरंगाबादेत चर्चा

| Updated on: Aug 02, 2022 | 6:19 PM

औरंगाबादमधील आमदारांना एकनाथ शिंदे गटात जाण्यासाठी मन वळवण्यात आमदार संजय शिरसाट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे बोलले जात आहे. यासाठीच त्यांना मंत्रिपद मिळेल, अशीही चर्चा सुरू आहे. 

औरंगाबाद : शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्याविषयी आदर असल्याचे वारंवार बोलून दाखवत आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी कितीही भावनिक आवाहन केलं तरी शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेले आमदार त्यांना प्रतिसाद देताना दिसत नाहीत. औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी तर आता त्यांच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा फोटो काढल्याचे समोर आले आहे. शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच दौरा झाला. या दौऱ्याच्या काही दिवस आधी शिरसाट यांनी त्यांच्या ऑफिसमधील हे दोन्ही फोटो काढले आहेत. त्यामुळे सर्वांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, औरंगाबादमधील आमदारांना एकनाथ शिंदे गटात जाण्यासाठी मन वळवण्यात आमदार संजय शिरसाट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे बोलले जात आहे. यासाठीच त्यांना मंत्रिपद मिळेल, अशीही चर्चा सुरू आहे.