तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावतील. अशातच आता इंडिया आघाडीने पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
इंडिया आघाडीने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे. आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. काही दिवसांपासून सत्ताधारी-विरोध प्रचार सभांमधून एकमेकांवर टीका करताना बघायला मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या सभेत पाकिस्तानचे झेंडे होते असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मूलभूत प्रश्न भरकटण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची ही एक कल्पना असते. पण ती सध्या चालणार नाही. दहा वर्ष झाले तुम्ही त्यांना धडा शिकवणार होता अजूनही पाकव्याप्त काश्मीर आलाच नाही. चीन लडाखमध्ये घुसतोय. तेथील उपोषण करणाऱ्या व्यक्तीला ते भेटायला गेले नाहीत. ह्याचं फक्त तोडा फोडा राज्य करा यावरच भाजपचा भर आहे. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.