‘बूंद से गयी वो हौद से नही आतीं’ गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या युतीवर तीव्र टीका केली आहे. ठाकरे गटाने विचारधारा सोडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाटील यांनी ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. विधानसभा निकालानंतर या युतीमध्ये कुरघोड्या सुरू झाल्या असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
ही जी युती ( शिवसेना ठाकरे गट – काँग्रेस) झालेली आहे, ती टिकणारी युती आहे. उद्धव ठाकरे कोणत्या विचारांचे होते, ते कोणामुळे तिकडे गेले, काँग्रेसचा काही ठिकाणाच राहिलेला नाही. विधानसभा निकालामुळे एकमेकांवर आता कुरघोड्या सुरू झाल्या आहेत , काही दिवसांनी हे पक्ष शिल्लक राहतील की नाही, अशी परिस्थिती उद्भवेल, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंवर टीका केली ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून तू राहशील किंवा मी राहीन असं आव्हान दिलं होतं, तेच आता त्यांची पप्पी घेत आहेत, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ते आता वाट्टेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
एवढंच होतं तर आम्ही कार्यकर्ते जेव्हा सांगत होतो की विचारधारा सोडू नका, त्याचवेळेस हे ऐकलं असतं तर आज हे दिवस आले नसते, असा गुलाबराव पाटील यांनी सुनावलं. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रु नाहीत, असं काल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. त्यावरही गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं. ज्यांनी विचारधारा सोडली, ते पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा विचार करावा.ज्यावेळेस आपली गरज होती, पक्ष अडचणीत होता, तेव्हा हे लोक ( ठाकरे गट) कोणासोबत होते, आता यांच्याकडे काहीच राहिलं नाही, म्हणून ते तुमच्याकडे येतात. तुमच्याशी गोड बोलतात, पण ते कोणाचेच नाहीत. ,’बूंद से गयी वो हौद से नही आतीं’ असे म्हणत गुलाबराव पाटलांनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली.