‘.. तर मग मात्र पंचाईत होईल’; दिशा सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरण आज पुनः एकदा वर आल्याने आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं आहे.
दिशा सालियान हत्येवरून आज सत्ताधारी पक्षाने आदित्य ठाकरे यांना चांगलंच धारेवर धरलं. विधिमंडळाच्या अधिवेशनात यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांत चांगलीच खडाजंगी देखील झालेली बघायला मिळाली. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी कोर्टाने बोलावल तर जाईल, जे होईल ते होईल.. असे उत्तर या प्रकरणावर दिलं आहे. त्यानंतर आता शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिशा सालियान प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. त्यांच्या कुटुंबाला काय द्यायचं ते न्यायालयात देऊ द्या. आमच्या घराण्याच्या सहा – सात पिढ्या जनतेच्या समोर आहेत. त्यामुळे या विषयात काहीही तथ्य नाही. दुरान्वयाने सुद्धा यात काही संबंध नाही. पण राजकारण जर या वाईट बाजूला न्यायचं असेल तर सगळ्यांचीच पंचाईत होईल आणि तुमच्यावर सुद्धा बूमरॅंग होऊ शकेल, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या

नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया

तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
