Special Report|Kirit Somaiyaयांनी Mansukh Hiren यांच्या हत्येवरुनUddhav Thackerayयांना टार्गेट केलंय

| Updated on: May 08, 2022 | 12:13 AM

एनआयएला भेटून हा तपास पुढे चालावा. या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या त्याच्या फाईल्स शोधाव्यात, यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची विनंती करणार असल्याचंही किरीट सोमैया यांनी सांगितले.

ठाणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज ठाण्यात मनसुख हिरेन यांच्या घरी भेट दिली. यावेळी सोमैया यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मनसुख हिरेन हत्याकांडामागे हेतू वसुलीचाच होता. या वसुलीचं काम उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यालयानं अनिल देशमुखांना दिलं होतं आणि यातूनच मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी करून रान उठवलंय. एनआयएला भेटून हा तपास पुढे चालावा. या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या त्याच्या फाईल्स शोधाव्यात, यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची विनंती करणार असल्याचंही किरीट सोमैया यांनी सांगितले.

Published on: May 08, 2022 12:13 AM