सोलापूरांसाठी आनंदाची बातमी; थेट ‘या’ धरणातूनच पिण्यासाठी पाणीपुरवठा!
तर पिण्याच्या पाण्याचेही वांदे झाले. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. आता मात्र सोलापुरकरांसाठी आनंदाची बातमी असून उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे.
सोलापूर : उन्हाळा संपत आला आहे. आता मे महिन्यातील अजून 20 एक दिवस शिल्लक आहेत. मात्र यादरम्यान यंदा शंभर टक्के भरलेले उजनी धरण (Ujani Dam) वजा पातळीत गेल्याने सोलापूर (Solapur) जिल्ह्याची चिंता वाढली आहे. तर पिण्याच्या पाण्याचेही वांदे झाले. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. आता मात्र सोलापुरकरांसाठी आनंदाची बातमी असून उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. आज सकाळी 6 वाजलेपासून हे पाणी सोडले जात आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औंज बंधाऱ्यात पाणी पोचल्यानंतर धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात येणार आहे.
Published on: May 12, 2023 09:43 AM
Latest Videos