…तर मनीषा कायंदे अपात्र ठरणार? कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणतात…
आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनीषा कायंदे यांच्या बंडाने त्यांच्यावर यांच्या अपात्रतेचा मुद्दा चर्चेत आला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव: आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनीषा कायंदे यांच्या बंडाने त्यांच्यावर यांच्या अपात्रतेचा मुद्दा चर्चेत आला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता शिवसेना हा अधिकृत पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी आपण शिंदे गटामध्ये प्रवेश करीत आहोत असं जाहीर केलं असलं, तरी ती अपात्रता मानली जात नाही. कारण मी शिवसेनेतच आहे, मी शिवसेना सोडलेली नाही, असा युक्तिवाद त्या करू शकतात. त्यामुळे दहाव्या परिशिष्टानुसार मनीषा कायंदे अपात्र होऊ शकतात किंवा नाही याचा निर्णय विधानपरिषदेच्या सभापतींना घ्यावा लागेल”,” असं उज्ज्वल निकम म्हणाले.
Published on: Jun 20, 2023 07:31 AM
Latest Videos