राज्यपाल पद अन् कार्यकाळ, उल्हास बापट यांच्याकडून कायदेशीर बाबी
उल्हास बापट यांच्याकडून ऐका कायदेशीर बाबी, पाहा काय म्हणाले...
राज्यापालपदाचा कार्यकाळ, त्यांची नेमणूक याविषयी घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी माहिती दिली आहे. घटनेच्या 155 कलमाखाली राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात. तर 156 कलमाखाली राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतात. राष्ट्रपती कुठल्याही क्षणी राज्यपालांना काढू शकतात. परंतु राज्यपाल कधीही त्यांचा राजीनामा देऊ शकतात. परंतु पुढचे राज्यपाल येईपर्यंत ते पदावर राहू शकतात हेच घटनेत सांगितले आहे. ज्या ज्या देशात लोकशाही आहे त्या सगळ्या देशात पंतप्रधान केंद्रित शासन व्यवस्था झाली आहे. आपली सत्ता पंतप्रधानाच्या हातात एकटवलेली आहे आणि राष्ट्रपती देखील पंतप्रधानांच्या सांगण्यावरूनच कारभार करत असतात, अशी माहिती उल्हास बापट यांनी दिली आहे.
Published on: Jan 24, 2023 03:49 PM
Latest Videos