अत्यंत किळसवाणा प्रकार… हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही समोसा खाणंच सोडून द्याल

| Updated on: Mar 05, 2024 | 4:34 PM

कारागीर पायाने सामोसे बनवण्यासाठीची पीठ तुडवीत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा स्थानिक गावकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार चित्रित केला होता. या घटनेनंतर चिडलेल्या गावकऱ्यांनी दुकानावर धडक देत संबंधित तळलेले पदार्थ विकण्यावर दुकानदारावर बंदी आणली आहे.

Follow us on

ठाणे, ५ मार्च २०२४ : एका मिठाईच्या दुकानात कारागीर पायाने सामोसे बनवण्यासाठीची पीठ तुडवीत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा स्थानिक गावकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये हा प्रकार चित्रित केला होता. या घटनेनंतर चिडलेल्या गावकऱ्यांनी दुकानावर धडक देत संबंधित तळलेले पदार्थ विकण्यावर दुकानदारावर बंदी आणली आहे. तसेच गावकऱ्यांनी दुकानातील साहित्य दुकानदाराला फेकून देण्यास भाग पाडले. उल्हासनगर कॅम्प 4 च्या आशेळेगाव प्रवेशद्वारावर हरिओम स्वीट नावाचे गेल्या 15 वर्षांपासून दुकान आहे. या मिठाईच्या दुकानात समोसे, कचोरी, वडापाव, ढोकला आदी खाद्यपदार्थ विक्रीसाठी असतात. जवळपास पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावाच्या वेशीवर हे एकमेव गोड पदार्थ विकणारे दुकान असल्याने अख्खे आशळे गाव या दुकानातून मिठाईची खरेदी करते. काल समाज माध्यमांवर या दुकानात एक कारागीर समोसे बनविण्यासाठी पायाने पीठ तुडवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. यावेळी दुकानदाराला जाब विचारला असता कारागिराने ही चूक मान्य केली. मात्र संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मिठाईच्या दुकानात बनवले जाणारे साहित्य विकायचे नाही, बड्या कंपन्यांचे पॅकिंग फूड विकायचे असे गावकऱ्यांनी या दुकान मालकाला समजावले.