‘अशा वक्तव्यामुळेंच 90 टक्के शिवसेना फुटलीय’; राष्ट्रवादी नेत्याचा सत्तेत जाताच राऊत यांच्यावर हल्लाबोल
त्यांच्यावर आता टीका होत आहे. यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला निशाना करताना, राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्याइतपत अजित पवार यांना अक्कल नाही असं म्हटलं होतं.
मुंबई : अजित पवार यांनी मास्टरस्ट्रोक मारत थेट राष्ट्रवादी काँग्रेसच आपल्या ताब्यात घेतली. तर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून महायुतीत एन्ट्री केली. त्यावरून त्यांच्यावर आता टीका होत आहे. यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला निशाना करताना, राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्याइतपत अजित पवार यांना अक्कल नाही असं म्हटलं होतं. त्यावरून आता राऊत यांचा समाचार राष्ट्रवादीचे नेते घेत आहेत. याचमुद्द्यावरून अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजित पवारांची अक्कल काढणाऱ्या संजय राऊतांनी पहिल्यांदा स्वतःचा मेंदू तपासून घ्यावा असा टोला लगावला आहे. तर राऊत यांच्यावर आरोप करताना, त्यांच्या वक्तव्यामुळे 90 टक्के शिवसेना फुटली. इतकेच काय तर त्यांनीच महाविकास आघाडी सरकार पाडल्याचं म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरेंचे साम्राज्य संजय राऊतांनी उद्धवस्त केल्याचही त्यांनी म्हटलं आहे.