Amit Shah Mumbai Tour : संजय राऊत यांच्या दाव्यावर भाजप मंत्र्याचा पलटवार; म्हणाले, सभा पहायला…
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत. तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत.
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका करताना, ते महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पाहण्यासाठी महाराष्ट्रात येत असल्याचे म्हटलं होतं. त्यावर भाजपने पटलवार केला आहे. भाजपचे नेते वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राऊत यांना टोला लगावत, सभा पहायला महाराष्ट्रात यावं लागत नाही असं म्हटलं आहे. तर राऊत यांना अजून माहित नाही, की कुणाची सभा पाहायला महाराष्ट्रात यावं लागत नाही’. अशा सभा टिव्हीवर पाहता येतात. महाराष्ट्रात येऊन टिव्ही पाहण्याची गरज नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत. तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत.
Published on: Apr 15, 2023 01:29 PM
Latest Videos