काय झालं अस की अमित शाह यांना नागपूर दौरा रद्द करावा लागला?
शाह यांचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. उद्या दोन दिवसांसाठी शहा नागपूरमध्ये येणार होते. ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजकीय बैठक घेऊन चर्चा करणार होते.
नागपूर : राज्यातील बदलत्या राजकीय घडामोंडिच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नागपूर दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात होता. मात्र शाह यांचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. उद्या दोन दिवसांसाठी शहा नागपूरमध्ये येणार होते. ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजकीय बैठक घेऊन चर्चा करणार होते. यादरम्यान त्यांचा अचानक दौरा रद्द झाल्यानं तर्क-वितर्क वर्तवले जात आहेत. मात्र, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रीय दुखवटा असल्यानं दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. बादल यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
Published on: Apr 27, 2023 08:29 AM
Latest Videos