राऊत यांच्यामध्ये संस्कारांची कमी; शिवसेना नेत्याची राऊत यांच्यावर जहरी टीका
त्यांनी, नागपूरमधील महाविकास आघाडीची भव्य सभा पहाण्यासाठी शाह हे महाराष्ट्रात आले असतील, असे त्यांनी म्हटलं होतं. त्यावर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी जहरी टीका केली आहे.
खारघर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना ‘महाराष्ट्रभूषण’ (Maharashtra Bhushan) सन्मानाने गौरविण्यात आले आहे. याच्याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शाह यांच्यावर निशाना साधत टीका केली होती. त्यांनी, नागपूरमधील महाविकास आघाडीची भव्य सभा पहाण्यासाठी शाह हे महाराष्ट्रात आले असतील, असे त्यांनी म्हटलं होतं. त्यावर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी जहरी टीका केली आहे. शिरसाट यांनी, राऊत यांच्यामध्ये संस्कारांची कमी आहे. त्यामुळेच त्यांनी येथे असायला हवं होतं. पण येथे नाहीतर नाही किमान टिव्हीवर तरी महाराष्ट्रभूषण कार्यक्रम त्यांनी पहावा. थोडे तरी संस्कार येतील, थोडाफार बदल होईल असे म्हटलं आहे.