मुंबईत शाह का आले असतील?; राऊत यांनी दिले 'हे' उत्तर

मुंबईत शाह का आले असतील?; राऊत यांनी दिले ‘हे’ उत्तर

| Updated on: Apr 30, 2023 | 12:28 PM

मागे नागपुरात मविआची वज्रमूठ सभा झाली तेव्हा ते खारघरमध्ये येऊन गेले. नागपूरमध्ये झाली तेथे येऊन गेले. तर आता मविआची ताकद पाहायला ते मुंबईत येत आहेत.

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आज मुंबईत आहेत. तर, उद्या मुंबईतच महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभा होत आहे. यापार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी निशाना साधला आहे. तसेच शाह हे उद्याच्या मविआच्या सभेची तयारी आणि मविआची ताकद पाहायला पुन्हा मुंबईत येत आहेत, असा टोला लगावला आहे. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा मविआची वज्रमूठ सभा होते, तेव्हा तेव्हा अमित शाह महाराष्ट्रात येतात. मागे नागपुरात मविआची वज्रमूठ सभा (Vajramooth Sabha) झाली तेव्हा ते खारघरमध्ये येऊन गेले. नागपूरमध्ये झाली तेथे येऊन गेले. तर आता मविआची ताकद पाहायला ते मुंबईत येत आहेत. त्यांचे मुंबईत स्वागत आहे. सभेत येऊन अमित शहांनी शिवसैनिकांचा उत्साह, जल्लोष, ताकद पहावी. त्यांच्यासाठी एक विशेष खुर्चीदेखील ठेऊ असं राऊतांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 30, 2023 12:28 PM