‘ते त्यांच्या तत्त्वापासून लांब सोनिया गांधी यांच्याकडे गेले’; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात

‘ते त्यांच्या तत्त्वापासून लांब सोनिया गांधी यांच्याकडे गेले’; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात

| Updated on: Jun 11, 2023 | 3:24 PM

मुख्यमंत्री भाजपचा होईल हे अनेकदा सांगितल्याचा पुनरुच्चार शाह यांनी केला. त्यावर आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आपले मत मांडले आहे.

ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल नांदेडमध्ये सभा झाली. येथे त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी फक्त सत्तेसाठी काँग्रेसशी घरोबा केला अशी टीका केली. तर मुख्यमंत्री भाजपचा होईल हे अनेकदा सांगितल्याचा पुनरुच्चार शाह यांनी केला. त्यावर आता आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आपले मत मांडले आहे. त्यांनी, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या. दोघेजण एकत्र या पणे त्या ठिकाणी लढलो. शिवसेनेच्या 55 भाजपच्या 105 सीट आल्या. त्यावेळी मुख्यमंत्री भाजपचा होईल असेच ठरलं होतं. अनेक वेळा प्रचार सभांमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी यांचा उल्लेख केला होता. तेव्हा स्वतः उद्धव ठाकरे व्यासपीठावरती होते. एकदाही त्यांनी याबाबत खंडन केले नाही. मात्र जसा निकाल लागला तसे त्यांनी भाजपशी फारकत घेतली.

Published on: Jun 11, 2023 03:13 PM