अजय मिश्रा आले आणि शिंदे गटाचं कमी झालेलं टेन्शन पुन्हा वाढलं; मिश्रा असं काय म्हणाले?

अजय मिश्रा आले आणि शिंदे गटाचं कमी झालेलं टेन्शन पुन्हा वाढलं; मिश्रा असं काय म्हणाले?

| Updated on: Jan 04, 2023 | 10:23 PM

केंद्रीय मंत्री अजय मिश्रांच्या उस्मानाबाद दौऱ्यामुळे आणि तेथे त्यांनी केलेल्या दाव्यामुळे. मिश्रा यांना मिशन 44 नाही तर मिशन 48 चा दावा केला आहे. ज्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे टेन्शन वाढलं आहे

उस्मानाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्रात आले आणि सभा घेऊ मिशन 44 देऊन गेले. त्यानंतर राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखिल येत्या निवडणुकीत पक्षाने मिशन 44 दिल्याचे सांगतिलं. त्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढलं होतं. ते कमी होत ना होत तेच पुन्हा एका शिंदे गटाचे टेन्शन वाढलं आहे.

शिंदे गटाने भाजपशी जवळीक करत राज्यात सत्ता आणली. पण आता मिशन 44 मुळे शिंदे गट काय करणार अशीच चर्चा सुरू होती. यावेळी बावनकुळे यांनी शिंदे गटाला सोबत घेऊनच निवडणुका लढवणार असल्याचे जाहिर केलं होतं. ज्यामुळे शिंदे गटाचं टेन्शन कमी झालं होतं.

मात्र आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे टेन्शन वाढलं आहे. ते केंद्रीय मंत्री अजय मिश्रांच्या उस्मानाबाद दौऱ्यामुळे आणि तेथे त्यांनी केलेल्या दाव्यामुळे. मिश्रा यांना मिशन 44 नाही तर मिशन 48 चा दावा केला आहे.

Published on: Jan 04, 2023 10:23 PM