कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली मोठी घोषणा
गेल्या दोन दिवसापासून राज्यात कांदा उत्पादक शेतकरी हा आक्रमक झाला आहे. तर केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढीला जोरदार विरोध शेतकऱ्यांनी केला आहे.
मुंबई : 22 ऑगस्ट 2023 | गेल्या दोन दिवसापासून राज्यातील कांदा व्यापार आणि कांदा लिलाव हा बंद आहे. ज्यामुळे ६० ते ७० कोटींची उलाढाल टप्प झाली आहे. तर कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा विरोध केला आहे. तर हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. याचदरम्यान राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे दिल्ली येथे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या भेटीला गेले आहे. यावेळी राज्यातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी केंद्र सरकार मोठं पाऊल उचलंल आहे. तर केंद्रीय मंत्री गोयल यांनी दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा दिलासा मिळाला आहे. तर यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जापान येथून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क करून याबाबत चर्चा केल्याचे कळत आहे. तर आता नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.