तुम्ही नाव घेता कोण आहे हा ? नारायण राणे यांचा संजय राऊतांवर पलटवार

तुम्ही नाव घेता कोण आहे हा ? नारायण राणे यांचा संजय राऊतांवर पलटवार

| Updated on: Jan 06, 2023 | 7:41 PM

राणे म्हणाले, कोण आहे हो संजय राऊत, तुम्ही नाव घेता कोण आहे. त्याचा पक्ष एवढा आहे, असं म्हणताना त्यांनी हाताच्या बोटांचा छोटासा भाग दाखविला.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यात सधा जोरदार लागली आहे. त्यांच्यात सध्या एकमेकांवर आरोप आणि टीका होताना दिसत आहे. यादरम्यान आज पुन्हा एकदा त्यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. आज नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना, पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला. तसेच आपण ज्याचे नाव घेता. तो कोण आहे? असं म्हटलं आहे.

राजवस्त्र उतरवून या, असं संजय राऊत यांनी नारायण राणे यांना आव्हान दिलं होतं. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, संजय राऊत हा पळपुटा आहे म्हणून तो असं बोलतोय.

राणे म्हणाले, कोण आहे हो संजय राऊत, तुम्ही नाव घेता कोण आहे. त्याचा पक्ष एवढा आहे, असं म्हणताना त्यांनी हाताच्या बोटांचा छोटासा भाग दाखविला.

Published on: Jan 06, 2023 07:38 PM