संजय राऊत बोलतील तिथे यायला तयार; राऊत कोणाला चलेंज देतात?- नारायण राणे
राणें यांना संरक्षण सोडून एकटं फिरूण दाखवा असे आव्हाण दिलं होतं. त्यावर आज पत्रकारांनी विचारले असता राऊत यांना तू म्हणशील तिथे येतो. आताच संरक्षण सोडतो. बघुया काय करतो ते; असं खुलं आव्हानच नारायण राणे यांनी दिलं आहे.
मुंबई: ठाकरे गट आणि भाजपमध्ये सध्या वेगवेगळ्या विषयांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातला वाद हा चव्हाट्यावर येत आहे. हा वाद आज राम कदम यांच्या काशी यात्रेवेळी देखिल उफाळून आला. यावेळी नारायण राणे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रीया देताना कुणाला चॅलेंज देतोय? एकटा फिरा असं मला राऊत चॅलेंज देतो. मी काही सरकारकडे संरक्षण मागितलं नाही.
काल राऊत यांनी राणें यांना संरक्षण सोडून एकटं फिरूण दाखवा असे आव्हाण दिलं होतं. त्यावर आज पत्रकारांनी विचारले असता राऊत यांना तू म्हणशील तिथे येतो. आताच संरक्षण सोडतो. बघुया काय करतो ते; असं खुलं आव्हानच नारायण राणे यांनी दिलं आहे.
संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोपही राणेंनी करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे राणे आणि राऊत यांच्यातील वाद अधिकच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.