३ हजार आई-वडीलांना देव दर्शनाला नेत आहेत, पुण्याचे काम करत आहेत; राणेंच्या कदमांना शुभेच्छा
कदम यांच्या या उपक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थिती लावली. आणि त्यांच्या काशीला जाणाऱ्या ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली. यानंतर राणे यांनी कदमांचे तोंड भरून कौतूक देखिल केले.
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी काशी यात्रेचे मोफत आयोजन केलं. तसेच त्यांनी तब्बल ३ हजार आई-वडीलांना देव दर्शनाला येण्याची व्यवस्था केली आहे. कदम यांच्या या उपक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थिती लावली. आणि त्यांच्या काशीला जाणाऱ्या ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली. यानंतर राणे यांनी कदमांचे तोंड भरून कौतूक देखिल केले.
यावेळी नारायण राणे यांनी, मी यात्रेला शुभेच्छा देतो. आपण एकदातरी आई वडीलांना घेऊन देवदर्शन करतो मात्र राम कदम हे ३ हजार आई-वडीलांना देव दर्शनाला नेत आहेत. ते पुण्याचे काम करत आहेत. त्याला दिर्घ आयुष्य उत्तम आरोग्य लाभो. तो यशस्वी राजकारणी होवो अशा ही शुभेच्छा देतो.
कदम यांनी सुरू केलेल्या या अनोखा उपक्रमातून हजारो वृद्ध-आई वडिलांना काशीत भगवान विश्वनाथचे दर्शन होणार आहे. तर आतापर्यंत त्यांनी सात ट्रेनने घाटकोपरमधील भाविकांना काशीला नेले होते. शनिवारी ७ जानेवारी रोजी तीन हजार भाविकांची आठवी ट्रेन काशीला निघाली.
रेल्वेत यात्रेला जाणाऱ्या जेष्ठांच्या सुविधासाठी मोठी तयारी केली आहे. त्यांच्या खाण्यापिण्यापासून आरोग्यपर्यंत काळजी घेतली जात आहे. ट्रेनमध्ये २२ डॉक्टरांचा ताफाही सोबत ठेवला आहे. जे ज्येष्ठ मंडळींची सर्व काळजी घेणार आहे