Narayan Rane on Uddhav Thackeray | स्वाभिमान असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा-tv9
स्वाभिमान असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झाले आहे. हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेने भाजपशी युती करावी अशी मागणी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार ही गेले आहेत. याच दरम्यान बंड करणाऱ्या शिंदे यांना गटनेतेपदावरून काढण्यात आले आहे. त्यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर राणे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची हिंदुत्वाची भुमिका ही खरी आहे. तर अडीच वर्षामागे फसवणूक झाली आणि हे आघाडी सरकार झाले. ही तडजोड फक्त मुख्यमंत्री पदासाठी झाल्याचेही शिंदे यांना माहित आहे. शिंदे यांना अपमानस्पद वागणूक देण्यात आल्यानेच त्यांच्यातील स्वाभिमान जागा झाला. आणि त्यातूनच त्यांनी हे बंड केले. त्यामुळे सगळे मुख्यमंत्री ठाकरे यांना माहित आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता एक क्षणही या पदावर राहता कामा नये. त्वरीत राजीनामा राज्यपालांकडे द्यायाला हवा.