नितीन गडकरी यांचा कार्यकर्त्याला घंटा वाजवायचा सल्ला? का होतेय इतकी चर्चा? काय आहे किस्सा?
मात्र आपल्याकडेही आता पत्नीसाठी, मुलासाठी तिकट मागणं सुरू झालं आहे. यावरून एका कार्यकर्त्यानं मला विचारलं की जर असचं चाललं तर आम्ही काय करायचं यावर त्यांनी विनोदाने हातात घंटा घे आणि वाजव असे म्हटल्याचं सांगितलं.
नागपूर : सध्या देशाच्या राजकारणात ही घराणेशाही पहायला मिळतेच. मग तो काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस. फक्त याचे प्रमाण भाजपमध्ये कमी आहे. मात्र भाजपचे अनेक नेते हे पक्षात घराणेशाहीला स्थान नसल्याचे बोलतात. अशीच प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली आहे. त्यांनी भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, पिता-पुत्रांचा पक्ष नाही असं मोठं वक्तव्य केलं आहे. ते नागपुरातील स्नेह संमेलनात बोलत होते. त्याचबरोबर त्यांनी हे बोलताना पक्षातील सर्व नेत्यांचे कान टोचले आहेत. तर पतीने पत्नीचे, बापाने मुलासाठी तिकीट मागू नये असा दमच भरला आहे. तर भाजपमध्ये पंतप्रधानाच्या पोटातून पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या पोटातून मुख्यमंत्री किंवा मंत्र्याच्या पोटातून मंत्री होत नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. पिता-पुत्रांचा, आई-मुलाचा नाही. मात्र आपल्याकडेही आता पत्नीसाठी, मुलासाठी तिकट मागणं सुरू झालं आहे. यावरून एका कार्यकर्त्यानं मला विचारलं की जर असचं चाललं तर आम्ही काय करायचं यावर त्यांनी विनोदाने हातात घंटा घे आणि वाजव असे म्हटल्याचं सांगितलं. मात्र आता जनतेने आपल्या मुलाला तिकीट द्यावे, अशी मागणी केली. तर ते नक्कीच विचार करतील असेही ते म्हणाले.