निसर्गही कोपला,  सरकार उदासीन? शेतकऱ्यांनी आपला मालच रस्त्यावर फेकला, कुठ केला निषेध?

निसर्गही कोपला, सरकार उदासीन? शेतकऱ्यांनी आपला मालच रस्त्यावर फेकला, कुठ केला निषेध?

| Updated on: May 25, 2023 | 3:12 PM

कापूस आणि कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त होत रस्त्यावर कांदा आणि कापूस फेकत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. कापसाला आणि कांद्याला भावच मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला पीकावरचा खर्चही यावर्षी निघाला नाही.

बोदवड (जळगाव) : गेल्या काही दिवसापासून अवकाळी गारपीट आणि योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर शेतकऱ्याला कांद्यानं रडकुंडीला आणलं आहे. यावरून जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील बिचवे येथील शेतकरी आक्रमक झाला आहे. कापूस आणि कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त होत रस्त्यावर कांदा आणि कापूस फेकत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. कापसाला आणि कांद्याला भावच मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला पीकावरचा खर्चही यावर्षी निघाला नाही. उलट सोलापूरात एका सेतकऱ्याना आपल्याच खिशातील पैसे अडत्याला द्यावे लागले आहेत. यावरून शेतकरी संतप्त झाला आहे. शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा आणि कापूस फेकून दिला राज्य सरकारचा या ठिकाणी शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला. यावेळी आंदोलनात महिला शेतकरी देखील सहभागी झाल्या होत्या.

Published on: May 25, 2023 12:14 PM