Unseasonal Rain : अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
Unseasonal rain in Maharashtra : राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतात हातातोंडाशी आलेलं पीक या अवकाळीने आडवं झालं आहे.
कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. या अवकाळी पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात अनेक भागात वादळीवाऱ्यासह गारपीट देखील झाली आहे. नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, वर्धा, धुळे आणि बुलढाणा, या जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने कालपासून राज्यात धुमाकूळ घातल्याने शेतकरी मात्र पूर्ण हवालदिल झाला आहे. या गारपीटीमुळे शेतातली पिकं मातीमोल झाली आहेत. द्राक्ष बागांना देखील या अवकाळीचा चांगलाच फटका बसला आहे. काहही ठिकाणी अवकाळी पावसाच पाणी शेतात जमल्याने पिकं पाण्यात आडवी झालेली बघायला मिळत आहे. यामुळे आता शेतकरी मात्र पुरता हवालदिल झालेला बघायला मिळत आहे.

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय

'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी

'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात

'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
