'या' जिल्ह्यात उन्हाचे चटके वाढले; पारा 44 अंशावर, अरोग्य विभागाने सुरू केलं कोल्ड वॅार्ड? कसं आहे? वॅार्ड पहाचं

‘या’ जिल्ह्यात उन्हाचे चटके वाढले; पारा 44 अंशावर, अरोग्य विभागाने सुरू केलं कोल्ड वॅार्ड? कसं आहे? वॅार्ड पहाचं

| Updated on: May 15, 2023 | 9:58 AM

दरम्यान, हवामान खात्याने नागपूर शहरात 14 आणि 15 मे रोजी हिट वेव्हचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह विदर्भाचं तापमान हे 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

नागपूर : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानंतर आता उष्णतेचा पारा चढताना दिसत आहे. राज्यात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून अनेक ठिकाणी तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या बाहेर गेलं आहे. दरम्यान, हवामान खात्याने नागपूर शहरात 14 आणि 15 मे रोजी हिट वेव्हचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह विदर्भाचं तापमान हे 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढणार असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे वाढलेल्या तापमानामुळे लोकांना उष्णाघाताचा सर्वात जास्त धोका असतो. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात उष्माघाताचे रुग्ण वाढल्यास वेळेत उपचार करण्यात यावे, त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने तीन रुग्णालयात 30 बेडचे कोल्ड वॅार्ड सज्ज केलेय. या वॅार्डमधील वातावरण थंड रहावं म्हणून मोठे डेझर कुलर्स लावण्यात आलेय. शिवाय उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसा औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आलाय.

Published on: May 15, 2023 09:58 AM