महाराष्ट्रामध्ये 17 मार्चपर्यंत गारपीटीचा अंदाज
राज्यात हलका पावसासह 17 मार्चपर्यंत गारपीट होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रामध्ये 17 मार्चपर्यंत गारपिटीचा तर मुंबई आणि कोकण वगळता इतरत्र हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेडमध्ये पाऊस होण्याची शक्यता असून मुंबई आणि कोकण वगळता इतरत्र हलक्या पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे. हवामान विभागाच्या मते, पुढच्या दोन दिवसांत नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला आहे. यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्यात हलका पावसासह 17 मार्चपर्यंत गारपीट होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. यामुळे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काढणीला आलेल्या पिकांचं तसेच द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
Published on: Mar 16, 2023 09:24 AM