राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांना गारपिटीचा तर कोठे जारी केला ऑरेंज अलर्ट?
तर संपुर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हाहाकार केला असून शेतकरी हवालदिन झालेला आहे. गारपीट आणि अवकाळी मुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात राज्यभरात झाले आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे राज्यातला शेतकरी हैराण आहे. तर अनेकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यादरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाने राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट जारी करताना गारपिटीचीही शक्यता वर्तवली आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर संपुर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हाहाकार केला असून शेतकरी हवालदिन झालेला आहे. गारपीट आणि अवकाळी मुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात राज्यभरात झाले आहे. यादरम्यान आता पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट करण्यात आल्याने आळखीन नुकसान होण्याची शक्यता आहे. तर पुन्हा एकदा राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी आणि गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.