ठाण्यासह मुंबईत अवकाळीची हजेरी, गरमीत गारव्याचा अनुभव
ठाण्यासह मुंबईत अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह दमदार हजेरी लावली
मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच अनेक ठिकाणी गारपीटदेखील झाली. मुंबई आणि कोणकणातील काही भागात हा अवकाळी पोहचला नव्हता. आता मात्र ठाण्यासह मुंबईतही पावसाने गारवा दिला. ठाण्यासह मुंबईत अवकाळी पावसाने विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह दमदार हजेरी लावली. यामुळे सकाळीच कामावर निघालेल्या नोकरदार, वृत्तपत्र विक्रेते ते शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडवली. तर गेले आर्धातास अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. यामुळे उन्हाच्या झळा बसणाऱ्या ठाणे आणि मुंबईकरांना थोडासा गारवा मिळला आहे.
Published on: Mar 21, 2023 08:21 AM
Latest Videos