कोकणासह मध्य महाराष्ट्रासाठी महत्वाची बातमी; बाहेर पडताय तर हवामान विभागाचा अंदाज पहाच
आताही पुणे वेधशाळेनं आणखीन एक अंदाज वर्तवला आहे. जो कोकणासह मध्य महाराष्ट्रासाठी आहे. येत्या दोन दिवसात काही भागात उष्णतेची लाट राहिल असा अंदाज विभागाने वर्तवला आहे.
पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पासवाने हाहाकार माजवला होता. अनेक जिल्ह्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. याबाबत वेळोवेळी हवामान विभागाने अलर्ट देण्यासह आपला अंदाज वर्तवला होता. जो खरा ठरला. आताही पुणे वेधशाळेनं आणखीन एक अंदाज वर्तवला आहे. जो कोकणासह मध्य महाराष्ट्रासाठी आहे. येत्या दोन दिवसात काही भागात उष्णतेची लाट राहिल असा अंदाज विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी योग्य ती काळजी घेऊनच बाहेर पडा. मराठवाड्यात सध्याचे तापमान हे सरासरीपेक्षा किचिंत जास्त होतं. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 44 पूर्णांक 1 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. अहमदनगर, जळगाव, मालेगाव, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा, याठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.