महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यात झाली सर्वाधिक तापमानाची नोंद, नागरिक झाले घामाघूम

महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात झाली सर्वाधिक तापमानाची नोंद, नागरिक झाले घामाघूम

| Updated on: May 12, 2023 | 11:09 AM

बर्‍याच ठिकाणी कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले. मालेगाव शहर व परिसरात रोजच्या रोज तापमान वाढत असून तापमानाने उच्चांक गाठला.

मुंबई : राज्याच्या अनेक ठिकाणी अवकाळी झाल्याने वातावरणात गारवा होता. पण आता मे महिना अर्धा संपत आला असताना आता देशातले तापमान दिवसागणिक वाढत आहे. देशात राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. बर्‍याच ठिकाणी कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले. मालेगाव शहर व परिसरात रोजच्या रोज तापमान वाढत असून तापमानाने उच्चांक गाठला. तापमानाचा पारा 43.8 अंश सेल्सियस पर्यंत गेल्याने उन्हाच्या दहाकातेने नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होते आहे. यंदाच्या उन्हाळ्यात सुरुवातीपासून अवकाळी पावसाचे सावट असल्याने उन्हाची तीव्रता जाणवली नव्हती परंतु मे महिन्याला सुरवात होताच तापमानाने उच्चांक गाठायला सुरवात केली आहे. गेल्या काही दिवसात तापमान 7 ते 8 अंशांनी वाढल्याने नागरिक आधीच घामाघूम झाले असतांना कालचा दिवस अधिकच तापदायक ठरला. सकाळी 10 वाजल्या पासूनच उन्हाचा तडाखा बसत असल्याने कामासाठी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. उन्हाची झळ अगदी घरांमध्ये देखील जाणवत असल्याने नको हा उन्हाळा अशीच काहीशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होते आहे. गेल्या काही दिवसात वाढत असलेले तापमान पाहता मालेगावचा पारा 45 गाठेल अशी चिन्हे दिसत असल्याने उन्हाची दाहकता अधिकच वाढण्याची चिन्हे असल्याने नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होते आहे.

Published on: May 12, 2023 11:09 AM