पावसाचं थैमान, तरी पाण्यासाठी नागरिकांची वणवण
आमगाव नगरपरिषद येथील कर्मचारी हे समायोजनाच्या मागणीसाठी उपोषणावर बसले आहेत. ज्यामुळे येथील पाणीपुरवठा गेल्या चार दिवसापासून बंद आहे
आमगाव/ गोंदिया : राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावत सगळं जनजीवन विस्कळीत केलं आहे. गोंदिया जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी एकीकडे पाऊस पण प्यायला पाणी नाही अशी स्थिती जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषद क्षेत्रात पहायला मिळत आहे. आमगाव नगरपरिषद येथील कर्मचारी हे समायोजनाच्या मागणीसाठी उपोषणावर बसले आहेत. ज्यामुळे येथील पाणीपुरवठा गेल्या चार दिवसापासून बंद आहे. ज्याचा नाहक त्रास महिलांना भोगाव लागत असून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यातच आता अवकाळी पाऊस पडत असल्याने तहान कशी भागावायची असा प्रश्न महिलांना पडला आहे. तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्यामुळे महिलांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर नळानद्वारे पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी आमगाव येथील नागरिकांनी केली आहे
Published on: Mar 18, 2023 11:13 AM
Latest Videos