अवकाळीच्या कळा आणि उष्णतेच्या झळा सोसत नांदेडचा शेतकरी काय करतोय पहा
त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कांदा पिकांचे नुकसान झाले. गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने कांदा भिजल्याने कांद्याचे मोठे नुकसान झालेय. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट येत असून लागवडीसाठी केलेला खर्च त्यातून निघतो की नाही अशी भीती शेतकऱ्यांना आहे.
नांदेड : राज्यात अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसल्या आहे. ज्यामुळे हातातोंडाला आलेला घास शेतकऱ्यांचा घास हिरावला आहे. असाच अवकाळीचा फटका नांदेडलाही बसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कांदा पिकांचे नुकसान झाले. गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने कांदा भिजल्याने कांद्याचे मोठे नुकसान झालेय. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट येत असून लागवडीसाठी केलेला खर्च त्यातून निघतो की नाही अशी भीती शेतकऱ्यांना आहे. दुसरीकडे सातबारावर नोंद केली नसल्याने नांदेडमधले कांदा उत्पादक अनुदानापासून देखील वंचित राहिले आहेत. या दुहेरी संकटामुळे कांदा लागवड करणारे शेतकरी यंदा अडचणीत आलेयत. याचदरमयान आता उन्हाची तीव्रता वाढल्याने उन्हाळी कांदा काढणीला वेग आलाय. त्याचबरोबर शेतकरी शेताच्या मशागतीत व्यस्त झालाय. जमिनीची वखरणी आणि नांगरणी करून जमीन भुसभुशीत करण्यासाठी शेतकरी उन्हातान्हात राबताना दिसतोय. जमीन जितकी तापल्या जाईल तितकी उत्पादन क्षमता वाढत असते, त्यामुळे सध्या वखरणी आणि “पलटी” नांगरणी करण्यात शेतकरी व्यस्त झालाय.